E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मोटार चोरणार्यास जन्मठेप
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
सत्र न्यायालयाचा निकाल
पुणे
: कॅब चालकाचा खून करुन त्याची कॅब चोरणार्या आरोपी गुन्हेगारास सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.तपिश पुखराज चौधरी (वय २६, रा. गगन उन्नती सोसायटी, ईस्कॉन मंदिराशेजारी, कोंढवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने कॅबचालक सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२, रा. घरकुल प्रॉपर्टीज, पठारे वस्ती, लोहगाव) यांचा २२ जून २०१९ रोजी खून करुन त्याची कॅब चोरुन नेली होती. कात्रज कोंढवा रस्त्यावर पोलिसांना मृतदेह सापडला होता. आरोपीची ओळख पटेल, असा कोणताही पुरावा नव्हता. शहरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी करीत असताना विमानतळाजवळील एका सीसीटीव्ही चित्रिकरणावरून त्या मृतदेहाची ओळख पटली.
सुनिल शास्त्री हे कॅबचालक असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी ओला कंपनीच्या मदतीने कॅबचे लोकेशन शोधल्यावर ती कॅब मोटार गुजरात राजस्थान सीमेवर असल्याचे आढळून आले.गुजरात पोलिसांना त्याची माहिती व लोकेशन पाठविल्यानंतर पोलिसांनी अमिरगड चेकपोस्टवर मोटारीसह तपिश चौधरी याला पकडले. अंमली पदार्थाचा चोरटा व्यापार करण्यासाठी त्याने कॅब मोटार चोरली होती. आरोपीने रात्री बारा वाजता वाकड येथून कोंढवा येथे जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यावेळी त्याने चालक सुनिल शास्त्री याचा दोरीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर मृतदेह बाहेर फेकून कॅब मोटार घेऊन तो फरारी झाला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी करुन न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. सबळ साक्षीपुराव्या अंती सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मिलिंद दातरंगे, प्रदिप गेहलोत कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार महेश जगताप यांनी काम पाहिले. या कामगिरीकरीता पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे व कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार महेश जगताप यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
दोन लाख देण्याबाबत शिफारस
न्यायालयाने आरोपीला शिक्षा देताना केलेल्या ५० हजार रुपयांच्या दंडापैकी २५ हजार रुपये शास्त्री यांच्या कायदेशीर वारसदारांना द्यावेत, असा आदेश दिला आहे. त्याबरोबरच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुनिल शास्त्री यांच्या कायदेशीर वारसदारांना २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत शिफारस करावी, असे सांगितले आहे.
Related
Articles
सलग पाच पराभवानंतर अखेर चैनईचा विजय
15 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
बलूचिस्तानात स्फोटाने उडविले पोलिस कर्मचार्यांचे वाहन
16 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
सलग पाच पराभवानंतर अखेर चैनईचा विजय
15 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
बलूचिस्तानात स्फोटाने उडविले पोलिस कर्मचार्यांचे वाहन
16 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
सलग पाच पराभवानंतर अखेर चैनईचा विजय
15 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
बलूचिस्तानात स्फोटाने उडविले पोलिस कर्मचार्यांचे वाहन
16 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
सलग पाच पराभवानंतर अखेर चैनईचा विजय
15 Apr 2025
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
16 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
बलूचिस्तानात स्फोटाने उडविले पोलिस कर्मचार्यांचे वाहन
16 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रेपो दरात पुन्हा कपात
2
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
3
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
4
विचारांची पुंजी जपायला हवी
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
शुल्कवाढीचा भूकंप